You are currently viewing कोरोना बाधिताच्या घरात निर्जतुकीकरण….

कोरोना बाधिताच्या घरात निर्जतुकीकरण….

सावंतवाडी नगराध्यक्षांचे सहकार्य.. संजू विरनोडकर टिमने केले कार्य…

सावंतवाडी

सालईवाडा मिलाग्रीज चर्च ते हनुमान मंदिर या परीसरात कोरोना बाधित रुग्ण आढल्यामुळे या परिसरात नागरीक चिंताग्रस्त होते. शहरातील प्रमुख रहदारीचा रस्ता व दाट वस्ती असणारा हा परीसर व कोरोनाची लागण ईतर नागरीकाना होवू नये म्हणून निर्जंतुकीकरण फवारणी आवश्यक होती. याची नागरीकानी नगराध्यक्ष संजु परब यांना जाणीव करुन दिली. तातडीने दखल घेत संजू परब यानी संजु विरनोडकर यांना संपर्क साधुन त्वरीत नाॅनब्लीच सोलुशनची व्यवस्था केली. कोरोना बाधिताचे घर परीसर मिलाग्रीज चर्च तिठ्यापासुन हनुमान मंदिर पर्यत रस्त्याच्या दुतर्फा असणारी सर्व घरे दुकाने बॅन्झाक्युलम क्लोराईट या प्रभावी सोलुशनने निर्जंतुकिकरण करण्यात आले. श्री. नार्वेकर यानी कै. बाळभाई बांदेकर यांच्या कार्याला ऊजाळा देत संजु विर्नोडकर यांचे आभार मानले. भारताचे नामवंत कब्बडीपट्टु सागर बांदेकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेवक बाळ खानविलकर, यतिन नाटेकर व स्थानिक नागरीकानी संजु विरनोडकर व टिमचे कौतुक करत आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा