You are currently viewing शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास कळणे माईन्स विरोधात जनआंदोलन

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास कळणे माईन्स विरोधात जनआंदोलन

आरपीआय जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांचा इशारा

सिंधुदूर्ग :

दोडामार्ग तालुक्यातील कळणे या गावात मे. मिनरल्स अँड मेटल्स व समृद्ध लि. या दोन कंपन्यांमार्फत खनिज उत्खननाचे काम सुरू आहे. जनमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागविलेल्या माहितीनुसार हे उत्खनन बेकायदेशीर असल्याचे समजते. या बेकायदेशीर कामामुळे डोंगराचा भाग फुटून मायनिंग मधील पाणी व चिखल शेतामध्ये घुसून शेतीचे आणि पर्यावरणाचे नुकसान झाले आहे.

तरी संबंधित कंपन्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी तसेच संबंधित कंपन्यांच्या मालकांवर आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात यावे. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असे निवेदन आर. पी. आय. जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा