कुडाळ :
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डने दहवीच्या अंतीम वर्षाचे निकाल जाहीर केले असून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल शाळेचा निकाल १००% लागला.
उच्च शिक्षणात CBSE अभ्यासक्रमाचे असलेले महत्व लक्षात घेऊन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांन ही शाळा २००९ मध्ये सुरु केली.अशी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाजगी पहिली आणि एकमेव शाळा असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग तीन वर्षे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या बॅचने हा शंभर टक्के निकाल लावत हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये या वर्षी आर्या पंकज कामत (९४.२०%) गुण मिळवून प्रथम , शुभम शैलेश प्रभू (९२.००%) द्वितीय, चेतन चेंदवणकर(९१.२०%) तृतीय, सौम्या सिंग(८८.८०%)चौथी, श्रिया कोचरे(८८.४०%) पाचवी आली.
ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या तासिकांचा विद्यार्थ्यांना खुप फायदा झाला. कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करून या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. त्याबद्दल प्राचार्य स्वरा गावडे, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, मधुरा इन्सुल्कर, नीलिमा कांबळी, श्रेया देसाई, ऋचा कशाळीकर, नंदकिशोर ढेकणे, प्रसाद कानडे, योगेश येरम
भावना प्रभू, प्रियांका सिंग, कौस्तुभ देसाई, गिरीजा सावंत, पवन शिमनगौड,व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.