वेगुर्ले नगरपरिषद येथील दुकान गाळ्यांच्या लिलाव प्रक्रिये ला शेवटी स्थगिती …
सनी बागकर तालुकाध्यक्ष वेंगुर्ला .
वेंगुर्ल्यातील स्थानिक व्यापारी आणि मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला नगरपरिषद सी.ई.ओ.यांची भेट घेतली व स्थानिकांना नगरपरिषदेने गाळा लिलाव प्रक्रियेत प्राधान्य द्यावे .तसेच जुन्या गाळे धारकांना आरक्षित गाळे द्यावे. हा विषय लावून धरला आणि आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली… वेंगुर्ले नगर परिषद ने तात्तकाळ लिलावाची मुदत वाढ दिली होती.
त्या नंतर नुकतीच स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांनी बैठक घेवुन गाळ्याची लिलावास तूर्तास स्थगिती दिलेली असून, सहा ऑगस्टला होणाऱ्या बैठकीस स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेच्या भूमिकांमुळे स्थानिक आमदार नगरसेवक यांनी ह्या प्रकरणात लक्ष घातले .. “देर आये दुरुस्त आहे ..” अस म्हणाव लागेल अशी खोचक टिप्पणी तालुकाध्यक्ष सनी बागकर यांनी व्यक्त केली.. जास्तीत जास्त स्थानिक व्यावसायिकांनी या लिलाव प्रक्रियेत सहभाग घ्यावा. जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखालील आम्ही त्याच्या पाठीशी ठाम पणे उभे राहु असे आवाहन त्यानी केले आहे.