You are currently viewing काजू व आंबा फळपिक विमा रक्कम तात्काळ आदा करा!

काजू व आंबा फळपिक विमा रक्कम तात्काळ आदा करा!

नागेंद्र परब जि. प.सदस्य तथा गटनेते यांची मागणी

या वर्षी काजू व आंबा हंगामामध्ये वातावरणामध्ये वेळोवेळी बदल होत गेले. तसेच अवेळी अतिवृष्टी झाल्यामुळे काजू व आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे काजू व आंबा शेतकरी वर्गाला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर काजू व आंबा शेतकऱ्यांना आर्थिक ताकद मिळणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या काजू व आंबा शेतकरी बांधवांनी फळ पिक विमा उतरविलेला आहे. त्यांना अद्याप विमा रक्कम ही प्राप्त झालेली नाही.त्यामुळे काजू व आंबा शेतकरी हतबल झालेले आहेत.

या अनुषंगाने जि. प. सदस्य तथा शिवसेना गटनेते श्री. नागेंद्र परब यांनी वेताळ बांबार्डे परिसरातील काजू व आंबा शेतकरी यांच्या उपस्थितीत जिल्हा कृषी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबधित विमाधारक शेतकऱ्यांना काजू व आंबा पिकाची विमा रक्कम तात्काळ आदा करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी करून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे काजू व आंबा शेतकऱ्यांच्या अडचणीकडे लक्ष वेधले

यावेळी आत्मा राज्य कमिटीचे सदस्य श्री. बाजीराव झेंडे,हिर्लोक किनळोस-उपसरपंच श्री.नरेंद्र राणे,माजी पंचायत समिती सदस्य श्री.आनंद भोगले, प्रगतशील शेतकरी श्री.विनोद सावंत व सावंत सर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा