You are currently viewing मनसेच्या शिष्टमंडळाने आज बीएसएनएल ला घातला घेराव

मनसेच्या शिष्टमंडळाने आज बीएसएनएल ला घातला घेराव

नेटवर्क व कामगारांच्या पगारा संदर्भात अधिकाऱ्यांना घेराव, अन्यथा आंदोलन छेडू मनसेचा इशारा

तालुक्यात गेले काही दिवस बी एस एन एल नेटवर्कचा फज्जा उडाला असून, आरोस दांडेली येथे नेटवर्क मिळत नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली मनसे ने घेराव घालत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. तसेच त्या भागतील एक कामगार ६ – ७ डिव्हिजन सांभाळत आहेत. त्या कामगारांचे पगार देखील गेले ७-८ महिने कॉन्ट्रॅक्टरने दिले नाही आहेत. यावेळी येत्या आठ दिवसांत ही समस्या दूर करण्यात यावीत अन्यथा मनसे आंदोलन करेल असा इशारा माजी जिल्हा उपाध्यक्ष ऍड अनिल केसरकर व शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी डिव्हिजनल इंजिनीयर कुलकर्णी यांना दिला . तसेच तालुक्यातील अन्य भागातही बीएसएनएल टॉवर उभारून त्याची फक्त उद्घाटने करण्यात आली आहे पण प्रत्यक्षात मात्र नेटवरचा सर्वच गाव पातळीवर भागात बट्ट्याबोळ आहे असे मत तालुका उपाध्यक्ष श्री सुधीर राऊळ म्हणाले. तर उपस्थित अधिकारी श्री कुलकर्णी यांनी आठ दिवसात आरोस येथील नेटवर्क पूर्ववत होईल व तालुक्यातील इतरही भागात लवकरात लवकर समस्या सोडवू असे मनसे शिष्टमंडळाला आश्वासन दिले यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ, अभिजित आरोसकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा