देवगड
देवगड तालुक्यातील किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे. यांच्या माध्यमातून चिपळूण येथील आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले आहे,
चिपळूण येथे आपत्तीग्रस्तांना मदत करतेवेळी मनस्वी घारे यांनी स्वखर्चातून तसेच भाजप उपाध्यक्ष महेश पाटोळे आणि आरे येथील ग्रामस्थांनी मोठी मदत दिली.
तसेच देवगड तालुक्यातील अन्य स्तरातून दिलेले जीवनावश्यक साहित्य मनस्वी घारे यांनी चिपळूण येथील पूरग्रस्तांपर्यंत स्वतः व कुणकेश्वर सरपंच गोविंद घाडी यांच्या मदतीने चिपळूण येथे नेऊन पोहोचविले आहे,
सामाजिक बांधिलकीतून गेले कित्येक वर्षे जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे सामाजिक कार्य करीत आहेत . कोरोना च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी गरजूंना अन्नधान्य वाटप ही केले आहे.
शासनाच्या अनेक योजनांची माहिती तळागाळातील जनतेला देऊन शासनाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना त्यांनी मिळवून दिला आहे त्यामुळे त्यांनी समाजसेवेचे व्रत हातात घेऊन समाजाचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे,