You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका पूरग्रस्तांना मदत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका पूरग्रस्तांना मदत

बांदा

निगुडे पाटीलवाडी व शेरले दुकानवाडी पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष श्री धीरज परब यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले यावेळी निगुडे पाटील वाडी याठिकाणी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी बोलताना सांगितले की आज कोकणामध्ये महापुराने अनेक ठिकाणी नुकसान झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना सूचना केल्या होत्या की ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या ठिकाणी मदत करा मी माझ्या सिंधुदुर्ग मनसे च्या नेतृत्वाखाली चिपळून पूरग्रस्त यांना सिंधुदुर्गातून ५००पुरग्रस्त कुटुंबांना मदत केली. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष तथा या निगुडे गावचे उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांनी पाटीलवाडी तील पूरग्रस्तांना आपल्या पक्षा मार्फत मदत करावी असे मला सांगितले तात्काळ आज याठिकाणी मदत उपलब्ध करून दिली निगुडे पाटीलवाडी तील सर्व नागरिकांनी मनसेचे आभार मानले व राज साहेबांना मनसेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी पूरग्रस्त श्यामसुंदर पाटील, अांतोन गुडीनो, धोंडू पाटील, मार्शल गुडीनो, सुहासिनी पाटील, जुजे फर्नांडिस, अक्षय शेगडे, नम्रता पाटील, नेकलेस गुडीनो, प्रिया पाटील, चैताली पाटील, मिनिन गुडीनो, लक्ष्मी पाटील तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री धीरज परब, हेमंत जाधव उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे, अॅड अनिल केसरकर माजी उपजिल्हाध्यक्ष, अॅड राजू कासकर परिवहन जिल्हाध्यक्ष, विठ्ठल गावडे तालुका सचिव, राकेश परब मळगाव शाखाध्यक्ष, श्री जगन्नाथ गावडे उपतालुकाअध्यक्ष कुडाळ व आदित्य राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा