You are currently viewing महामार्गावर जानवली येथे कंटेनर कलांडला

महामार्गावर जानवली येथे कंटेनर कलांडला

चालक जागीच ठार : सकाळी सातच्या सुमारास घडला अपघात

कणकवली

गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर मुंबई गोवा महामार्गावरील जानवली पुलाजवळ हॉटेल बावर्ची समोर महामार्गाच्या दुभाजकावर वर चढत पलटी झाला. यात कंटेनर चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. अपघात नेमका कसा घडला हे जरी समजले नसले तरी कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजकावर चढल्यामुळे पलटी झाला असावा अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात पलटी झालेल्या कंटेनर खाली चालक अडकल्याने चालकाचा कमरेखालील भाग अक्षरशः छिन्नविछिन्न झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कणकवली वाहतूक पोलीस संदेश आबिटकर, वैभव कोळी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर पलटी झालेला तो कंटेनर हटविण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले .

प्रतिक्रिया व्यक्त करा