राज्यातील अकरावी प्रवेशांसाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (FYJC CET 2021) अर्जांमध्ये दुरुस्तीसाठी ३१ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून विंडो ओपन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात काही दुरुस्ती करावयाची असेल, तर ती ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत करता येणार आहे.
*कोणत्या प्रकारचा बदल वा दुरुस्ती करता येणार?*
– ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक
– परीक्षेचे माध्यम, सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्रश्नांचे माध्यम
– विद्यार्थ्यांचा तात्पुरता किंवा कायमच्या निवासस्थानाचा पत्ता, त्यानुसार परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा, तालुका किंवा शहराचा विभाग
– प्रवर्ग
*कशी करता येईल दुरुस्ती?*
– अकरावी सीईटीच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर आपला अॅप्लिकेशन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक वापरून लॉग इन करावे.
-नंतर एडिट ऑप्शन (Edit Option) वर क्लिक करून भरलेल्या माहितीत दुरुस्ती करता येईल.
– आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर दुरुस्तीसह फॉर्म सबमिट करावा.
*एकाहून अधिक अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज डिलीट करता येणार*
काही विद्यार्थ्यांनी एकाहून अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांनी योग्य ते एकच आवेदनपत्र ठेवून अन्य अर्ज डिलीट करण्याची सुविधा १ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा देखील २ ऑगस्ट २०२१ पर्यंत उपलब्ध राहील. विद्यार्थ्यांनी हे ध्यानात घ्यावे की संगणक प्रणालीत एकच योग्य अर्ज असल्याची खातरजमा करावी आणि अन्य अधिकचे अर्ज डिलीट करावेत.