संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर यांचा पुढाकार..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मदत नव्हे तर सेवा या धोरणातून आज बांदा व इन्सुली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चांदिवली सेवा समिती ट्रस्ट यांच्या माध्यमातून संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर यांच्या पुढाकारातून आज धान्य व मेडिकल किट असे वाटप करण्यात आले. ह्यात तांदूळ तूरडाळ साखर चहा पावडर साबण कोलगेट तेल मीठ बिस्किट चटई व मेडिकल किट असे वाटप करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे घरेदारे व्यवसाय याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर बाब लक्षात येताच मनसे व चाँदीवली सेवा समिती ट्रस्ट यांच्या माध्यमातून सागर तुळसकर यांना मनसेचे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी संपर्क केला व सागर तुळसकर यांनी त्वरित वाटप करण्याचे शब्द दिला व आज ते स्वतः या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसमवेत वाटप करण्यासाठी आले व तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांमध्ये व त्या कुटुंबीयांना मनसेच्या वतीने वतीने वाटप करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्याचप्रमाणे वाटप केलेल्या बांदा व इन्सुली वासियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार जीजी उपरकर चांदिवली सेवा समिती ट्रस्टचे संस्थापक तथा संपर्क अध्यक्ष अध्यक्ष मनसे सागर तुळसकर यांचे बांदा व इन्सुली वासीय यांनी मानले आभार.
यावेळी संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर बांदा शहर अध्यक्ष बाळा बहिरे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार कुडाळ तालुका सचिव राजेश टंकसाळे डिंगणे ग्रामपंचायत सदस्य आदेश सावंत विभाग अध्यक्ष नाना सावंत वेंगुर्ला तालुका सचिव आबा चिपकर इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे धाकोरे शाखाध्यक्ष निलेश मुळीक लक्ष्मीकांत हरमलकर संदेश करपे आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच सदर वाटप करताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बांदा ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर येडवे व राकेश केसरकर आदी उपस्थित होते