बोलून न दाखवता कृतीतून करून दाखवणार असा आ.नितेश राणेंनी दिला होता शब्द
देवगड
तालुक्यातील तांबळडेग येथे पावसाळ्यात समुद्राने अतिक्रमण केल्याने दक्षिणवाडा येथील किनारपट्टीची धूप मोठ्या प्रमाणात झाली आहे, येथील स्मशानभूमी, मासे सुकविण्यासाठी बांधलेला ओटा, महावितरण चे खांब, रस्ता सुरची झाडे समुद्रात वाहून गेली आहेत या भागाची पाहणी घटनास्थळी भेट देऊन आ नितेश राणेंनी केली होती, येथे धुप्रतिबंधक बंधारा न झाल्यास पाच गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केले होते. गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तांबळडेग येथे तात्पुरता दगडी बंधारा बांधण्यासाठी आमदार नितेश राणेंच्या पाठपुराव्याने व प्रयत्नातुन २१ लाख ४३ हजार रुपयांची मंजुरी मिळाली आहे.
आमदार नितेश राणे यांनी पाहणी करून याठिकाणी संरक्षक बंधारा बांधावा अशी शिफारस जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून केली होती. या ठिकाणी जाऊन तहसीलदार महसूल चे सर्व अधिकारी यांच्यासह जागेची पाहणी केली होती. आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नाला यश आले असून जिल्हाधिकारी यांनी हा निधी अतिवृष्टी पूर व गारपीट या हेड खाली मंजूर केला आहे. तांबळडेग गावाची धूप होत असताना कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले