आरशात दिसते तुझी छबी
आनंदे हास्य फुलवणारी.
तुझी माझी प्रेम कहाणी
कधी ना कुणा समजणारी.
तुझ्या चेहऱ्यावरचे भाव,
मनास माझ्या कळतात.
आसवं तुझ्या डोळ्यातली,
माझ्या हृदयास छळतात.
कधी तू होतेस अबोल,
अबोला तुझा बरंच बोलतो.
न सांगताही तुझ्या मनातलं,
तोच सारं खरं सांगून जातो.
तुझी माझी भेट रोजची,
तरीही तू नजरेत बोलायची.
मिठीत माझ्या असताना तू,
हृदयाची धडकन बनायची.
बोल तुझे हळूवार प्रेमाचे,
हृदय माझे भेदून जातात.
क्षण तुझ्या आठवणीतले,
खोलवर हृदयी घर करतात.
(दिपी)✒️
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६