शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी बीएड अभ्यासक्रमासाठी विविध बीएड महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची सीईटी देणे अनिवार्य आहे आणि सदर प्रवेश परीक्षेचे अर्ज भरणे सुरू झाले आहे व या परीक्षेचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढली असून ती आता 07 ऑगस्ट आहे. तरी जे विद्यार्थी बी.ए बी. कॉम,बी. एसस्सी,किंवा एम. ए एम कॉम, एम एस्सी प्रविष्ट आहेत किंवा ज्याना खुला गट 50% मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 49. 50 % असतील अशा विद्यार्थ्यांनी हे प्रवेश अर्ज भरावेत,सद्यस्थिती कोरोना ची व अतिवृष्टी परिस्थिती बघता बॅरिस्टर नाथ पै बी.एड. महाविद्यालयात सदर फॉर्म मोफत भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. यासाठी आपण पुढील क्रमांकावर संपर्क 9420822878, 9423832705, 9423302859 साधावा.