You are currently viewing आमदार दीपक केसरकर उद्या पुन्हा करणार पूरग्रस्त भागाची पाहणी…

आमदार दीपक केसरकर उद्या पुन्हा करणार पूरग्रस्त भागाची पाहणी…

सावंतवाडी

माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर उद्या पुन्हा पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. यावेळी ते इन्सुलि,शेर्ले, कळणे आदी ठिकाणी भेट देऊन पहाणी करत पूरग्रस्तांशी चर्चा करणार आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे, इन्सुली येथे १०:३० वाजता तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, इन्सुली सरपंच यांच्यासमवेत पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर शेर्ले, वाफोली येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. दुपारी १:३० वाजता कळणे खाणीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा