– बाबा मोंडकर. जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघ
राज्य सरकार ने साखर कारखाना व सहकारी संस्थाच्या थकीत कर्ज भरावी कां या संदर्भात समिती गठित केली आहे या माध्यमातुन सुमारे ३८०० कोटी रुपयाची कर्जाची जबाबदारी महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. राज्यात गेले कित्येक वर्षात सहकार शेत्रात काम सुरू झाल्या पासुन अश्या प्रकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातुन घाटमाथ्यावरील सहकार क्षेत्र सांभाळायचे व जिवंत ठेवायचे काम इमाने इतबारे झालेले आहे एका बाजुला सहकार क्षेत्र सांभाळताना गेल्या ५० वर्षात मात्र अश्या प्रकारचे झुकते माप मात्र कोकणासाठी दिलेले दिसत नाही.गेले दोन वर्ष निसर्ग,फयान, क्यार,तौक्ते वादळ तसेच कौरोना व्हायरस आणि आता आलेला महापूरामुळे कोकणातील शेतकरी,बागायतदार,दुकानदार, मच्छीमार हा व्यापारी वर्ग व पर्यटन व्यवसायीक उध्वस्त झाला आहे.या भागातील प्रमुख व्यवसाय पर्यटन हा असून यावर येथील होम् स्टे, लॉजिंग, बोर्डिंग, हॉटेल, जलक्रिडा,वाहन धारक व अन्य व्यवसायिकांचा व्यवसाय चालतो. या भागातील व्यवसाय बंद असल्याने व्यवसाय देखभाल , कामगार पगार ,शासकीय कर, पाणी बिल,लाईट बिल,वाहन कर्ज ,ग्रुह व व्यवसाय कर्ज भरणार कुठून हा यक्ष प्रश्न पर्यटन व्यावसायिकां समोर उभा आहे.देशातील व राज्यातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्र सरकार ने १९९७ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यास पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता दिली घाटमाथ्यावर दूधसंघ, सूतगिरण, साखर कारखाने उभारणीसाठी हजारो कोटी रुपए खर्च केले गेले व आजही अविरत मदत चालू आहे त्यांच्या १% ही मदत कोकणातील व्यावसायिकांना आजपर्यंत झाली नाही.कौरौना व्हायरस ची जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केल्याप्रमाणे तिसऱ्या लाटेत कौरौना रुग्णसंख्या वाढ होण्यास सुरवात झाली असून व्यावसायिकांचे पुढील आर्थिक नियोजन होणार कुठून हा प्रश्न त्यांच्या समोर आहे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातुन उपमुख्यमंत्री श्री. अजितजी पवार यांच्या कडे राज्यसरकार ने साखर कारखाने व अन्य संस्थांच्या थकीत कर्ज सरकारने भरावे कां यांसाठी नेमलेल्या समिती मध्ये कोकणातील व्यापारी व पर्यटन व्यावसायिक यांचा समावेश करून कोकणातिल व्यावसायिकांच्या कर्ज, लाईट,पाणी बिल शासकीय देणी सरकार ने भरावी व कोकणातील अर्थव्यवस्था उभारण्यासाठी मदत करण्याचे आदेश देण्याची मागणी केल्याची माहिती श्री बाबा मोंडकर. जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघ यांनी दिली आहे.