तब्बल सात दिवस सुरु असलेल्या शोधमोहिमेला यश
बांदा
गाळेल येथे डोंगर खचून मातीखाली अडकलेल्या वेंगुर्लेतील युवकाचा मृतदेह अखेर शुक्रवारी मिळाला. त्यामुळे गेले सात दिवस ग्रामस्थ व प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत कार्याला यश आले. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. गेले सात दिवस गाळेल येथे पाच पोकलेन मशीनसह याबाबतचे शोधकार्य सुरू होते.