You are currently viewing राज्यपालांकडून प्रधानमंत्र्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन…

राज्यपालांकडून प्रधानमंत्र्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन…

मुंबई :

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्राद्वारे त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या दीर्घ आयुरारोग्याची कामना करताना ‘आपल्या कुशल नेतृत्वाखाली आपण देशाला नित्य नव्या उंचीवर घेऊन जावे’, या शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना आपल्या शुभेच्छा कळविल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + two =