बांदा
कोरोनाच्या काळानंतर वादात सापडलेली पत्रादेवी येथे टाकण्यात आलेली लाठी आज अखेर सुरू करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास त्या ठीकाणी प्रशासनाने जावून हा निर्णय घेतला. याबाबतची माहीती शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राउळ यांनी दिली. दरम्यान ही लाठी सुरू करण्यात आल्यामुळे बांदा तसेच सिमेवरच्या गावांसह व्यापार्यांनी आमदार दिपक केसरकर यांचे आभार मानले आहेत. तसेच आता गोव्यानेही त्या ठीकाणी प्रवेश देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी सिमेवरील ग्रामस्थांकडुन होत आहे.