जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रत्येक तालुक्यात 17 सप्टेंबर हा दिवस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आल्याची माहिती काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दिली होती.
याच अनुषंगाने आज सावंतवाडीत आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी ते म्हणाले होते. 2014 मध्ये केंद्रामध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान झाले त्यानंतर जे काही चुकीचे निर्णय केंद्र सरकारने घेतले उदाहरणार्थ नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी व चुकीच्या पद्धतीचे आर्थिक धोरण यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पंतप्रधान मोदी यांनी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते परंतू भारतात असलेला कोट्यवधी लोकांचा रोजगार केंद्र सरकारच्या अविचारी चुकीच्या धोरणांमुळे गेला आहे.
बेरोजगारीचा दर गेल्या पंचेचाळीस वर्षातील उच्चांकावर पोहोचला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिनीच रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा करणार असल्याचे सागितले होते. या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी कॉंग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.