जीवनाश्यक साहित्याचे वाटप करत लावला मोलाचा हातभार!
तळेरे : प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील कासार्डे,तळेरे, ओझरम,दारुम व दशक्रोशी ग्रामस्थांनी एक हात मदतीचा पुढे करत चिपळून येथिल महापूरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना व मुंबई गोवा महामार्गावर अडकून पडलेल्या वाहनचालकांना जीवनाश्यक साहीत्य वाटप करत मोलाचा हातभार लावून चिपळून शहरांसह परीसरांतील गावात थेट पूरग्रस्तांच्या हातात मदत सुपूर्त केली.
रत्नागिरीतील चिपळून तालुक्यात 22 व 23 जुलै 2021 रोजी महापूर आल्याने येथिल शहरासह व परीसरातील गावामध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. यात नुकसान झालेल्या बाधितांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी,कासार्डे,तळेरे, ओझरम,दारुम व दशक्रोशी ग्रामस्थांनी एकत्र येत चारशे जीवनाश्यक साहीत्याच्या किटसह, पाणी बॉटल व इतर साहीत्य गोळा करत थेट चिपळूनमध्ये दाखल होत गरजूंना मदतकार्य केले.
यामध्ये चिपळून शहरातील बहादूरशेख नाका,वडार कॉलनी, कळंबस्ते,फरशी,पेठमाप,मिरजोळे, गोवळकोट,खेर्डी खतातेवाडी, दत्तवाडी,दळवटने गणेशवाडी, चिपळून कराड रोड भागात पंचायत समिती चिपळून व चिपळूनस्थित सिंधुदुर्ग वासीयांच्या मदतीने परीसरातील अनेक भागातील नगाकरीकांना तसेच मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीचे पूल खचल्याने मुंबई व गोव्याच्या दिशेने अडकलेल्या शेकोडो अवजड वाहनांतील चालकांना जीवनाश्यक साहीत्य व पाणी बाॅक्स वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पत्रकारांनाही मदतीचे वाटप करण्यात आले. यासाठी श्री सिध्दीविनायक नवरात्र उत्सव मंडळ,नवतरुण उत्कर्ष मंडळ,कासार्डे,बाजारपेठ मित्रमंडळ, तळेरे, प्रगती युवक मंडळ व ग्रामस्थ मंडळ कासार्डे साटमवाडी सर्वच सभासदांनी विषेश मेहनत घेत सहकार्य केले.
फोटो : चिपळून कळंबस्ते ग्रामपंचायतीला जीवनाश्यक साहीत्य सुपूर्द कले यावेळी पं.स.चिपळून विस्तार अधिकारी मुरलीधर कुरई,अधिकारी व ग्रामस्थ