देवगड
छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या देवगड पंचायत सामितीच्या मासिक सभेची सुरुवात केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांच्या अभिनंदनाच्या ठरावाने झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांनी चिपळूण येथील नुकसानग्रस्त भागात तातडीने फौज मागवून जे धडाडीने निर्णय घेऊन कार्य केले ते फारच कौतुकास्पद आहे, अशा पद्धतीने सभागृहाने केंद्रीय मंत्री मा.नारायण राणे यांचे कौतुक केले आहे.
सदा ओगले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप करताना म्हटले आहे की,ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे त्या ठिकाणी स्थानिक लोक स्वतः काम करतात. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक बांधकाम चे ठेकेदार किंवा कर्मचारी कुठल्याही पद्धतीची माहिती देत नाही,आढावा देत नाहीत सगळा मुजोर कारभार चालू आहे. जे ठेकेदार काम करण्यास दिरंगाई करतात केव्हा निकृष्ट दर्जाचे काम करतात त्यांची नावे काळया यादीत टाकण्यास सभागृहाने मंजुरी दिलेली आहे. काम दर्जेदार होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे एकाच ठेकेदाराकडे देऊ नये प्रत्येक कामासाठी वेळवेगळा ठेकेदार असावा असे मत सदा ओगले यांनी व्यक्त केले.
विजयदुर्ग ग्रामपंचायत नूतनीकरणाचा निधी आला असताना तो खर्च न केल्याने वापराविना परत गेला या हलगर्जी पणाच्या वागणुकीबद्दल विजयदुर्ग ग्रामपंचायत चे ग्रामसेवक मुल्लानी यांच्यावर कारवाई चा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सभागृहामध्ये सांगण्यात आले.
तालुक्यातील एस टी वाहतुकीचा आढावा सुद्धा या सभेमध्ये घेण्यात आला त्यावेळी काही मोजक्या ठिकाणी सध्या एसटी जात असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कोरले,तांबळडेग,आचरा अशा ठिकाणी सध्या मुक्कामी एसटी जात असल्याने इतर भागातील गरीब व गरजू प्रवाशांच्या खिशाला नाहक कात्री पडत आहे त्यांना दुप्पट-तिप्पट पैसे खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी खाजगी वाहनाने यावे लागते यासाठी ज्या ठिकाणी एसटी सुरू नाहीत अशा ठिकाणी दोन दिवसात एसटी सुरू करा अशा पद्धतीची मागणी सदस्य सदा ओगले यांनी केली आहे.
शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी मुख्य आरोपींसह बारा लोकांना नोटीस दिलेले आहे त्यावर 100% कारवाई होईल आणि फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल होतील जर असे झाले नाही तर सर्व सदस्यांसोबत सीईओ कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा सभापती रवी पाळेकर यांनी दिला आहे. सभापती पुढे बोलताना असे म्हणाले की विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम या वायूचा शोध लागला आणि त्याच्या जनजागृतीचे काम माजी आमदार प्रमोद जठार यांनी खूप चांगल्या प्रकारे केले याचे आम्हाला खूप कौतुक वाटते संपूर्ण देवगड तालुक्यासाठी ही एक प्रतिष्ठेची बाब आहे त्यामुळे हेलियम डे हा पुढे जाऊन खूप चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा आपला मानस आहे यlअसेही सभापती रवी पाळेकर म्हणाले.
ज्या ठिकाणी जुनी अंगणवाडी आहे त्या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय बांधन्याचा प्रस्ताव संमतीसाठी पुढे दिले असण्याचेही रवी पाळेकर यांनी यावेळी सभागृहास सांगितले. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना नरेगा अंतर्गत तालुक्यात होणारी कामे का रखडतात याचा शोध घेणे गरजेचे आहे असे सदस्य अजित कांबळे यांनी म्हटले आहे
या सभेत आरोग्य,पाणीपुरवठा,एसटी,बांधकाम, शिक्षण विभाग,कृषी, पतन विभाग,वीज वितरण या संदर्भातील विषयांचा सविस्तर आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली