You are currently viewing अव्यक्त पुण्यप्रदा

अव्यक्त पुण्यप्रदा

व्यक्त कशा करू मी मनातील भावनां..
ही अव्यक्तताच ! अंतरातील पुण्यप्रदा..
गुंतला अलवार हा जीव तुझ्यात आता..
ही नि:सीम, सत्यप्रीत जीवनी पुण्यदा..।।..१

दैवजात ! हे ऋणानुबंधी नाते आगळे..
आज तुझ्याविना हे जग सारे रितेरीते..
चराचरी या सारेच लडिवाळ रूप तुझे..
नेत्री ! पाझरते संथ संथ प्रीतपुण्यप्रदा..।।..२

रूप तुझे मनभावले ,स्वर्गानंदी पर्वणी..
आठव सारे क्षणाक्षणांचे स्पर्श लाघवी..
निरवतेत उमलती पदर प्रीतभावनांचे..
हिच जीवनातील परमोच्य सुखसंपदा..।।..३

*रचना क्र. ९६ / २६ – ७ – २०२१*
*©️वि.ग.सातपुते.(भावकवी.)*
*📞9766544908*

प्रतिक्रिया व्यक्त करा