You are currently viewing कोकणातील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी देणार मदतीचा हात…

कोकणातील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी देणार मदतीचा हात…

शरद पवारांनी केले जाहीर; सिंधुदुर्गची जबाबदारी अमित सामंतांकडे…

मुंबई

सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात पुरस्थितीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोकण विभागातील सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील पुरस्थिती हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडे देण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मुंबई प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्रासह कोकणपट्टीतील सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे अनेक घरे, व्यावसायिक, छोटे मोठे दुकानदार यांच्या इमारतींमध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूसह अन्नधान्य, कपडे भांडी इत्यादींचे नुकसान झाले. सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच घरांचीही पडझड होऊन काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अशावेळी आपदग्रस्त कुटुंबांना काहीसा आधार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पञकार परिषदेचे सांगितले. यावेळी त्यानी सांगितले, कोकण विभागातील सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील पुरस्थिती हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे. जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडावी. कोणीही पूरग्रस्त राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या मदती पासून वंचित राहाणार नाही याची खबरदारी घेतली जावी. आपण आपल्या टिमसह सर्वांनी मिळून पूरग्रस्तांना सहकार्य करण्याचे नियोजन करावे, आणी बाधीत कुटुंबांना संकटातून बाहेर काढून दिलासा देण्याचे काम करा असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा