You are currently viewing शिवसेना शाखा कट्टाच्या वतीने  कोरोना योद्ध्यांचा सत्कार

शिवसेना शाखा कट्टाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

मालवण :

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा कट्टा यांच्या मार्फत करोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या डॉक्टर , विद्युत मंडळाचे कर्मचारी यांना शाल, भेटवस्तु व काजुचे कलम देवुन सत्कार करण्यात आला.

यावेळी कट्टा गुरामवाडी तील शेतकऱ्यांना काजुची कलमे वाटण्यात आली. याप्रसंगी माजी जि. प. समाजकल्याण सभापती व उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, महिला तालुकाप्रमुख सौ.श्वेता सावंत, वंदेश ढोलम, यशवंत भोजणे,बाळकृष्ण मसुरकर, बाबु टेंबुलकर , डॉ सावंत, डॉ वराडकर, डॉ पवार, डॉ सोमनाथ परब, वायरमन मोहाळे, नाईक, वारंग, गावडे, गिरकर, जगु मोरजकर, शाखाप्रमुख रवि गुराम नाना वाईरकर, विठ्ठल गुराम, हंजनकर, फाटक, राजू गावडे, सदा भोजणेे, बाळा गुराम, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. कट्टा शाखाप्रमुख देविदास रेवडेकर यांनी काजु कलमे उपलब्ध करून दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =