सावंतवाडी
राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका विमल तुकाराम नाईक यांचे आज सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस आजारी होत्या. पश्चात पती, मुलगा, सून, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे परिवार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य चळवळीत यांचे मोठे योगदान होते. त्या आदर्श शिक्षिका होत्या. मनमिळावू, शांत, स्वभावाच्या होत्या. सावंतवाडीत महिला बचत गट व महिलांना एकत्र करण्याचे काम त्यांनी केले होते. सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार टी. एन. नाईक यांच्या त्या पत्नी होत तर आरपीडी हायस्कूलच्या शिक्षिका सुमेधा नाईक धुरी यांच्या त्या मातोश्री होत.