महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस उद्या २७ जुलै रोजी कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये कुडाळ शहरात जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप, कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर वाटप, कुडाळ खरेदी विक्री संघ कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर वाटप, महिला रुग्णालय येथे सॅनिटायझर, साबण वाटप ,कुडाळ वरची कुंभारवाडी येथे छत्री वाटप करण्यात येणार आहे.
तसेच माणगाव तिठा येथे नेत्र तपासणी शिबीर, शेतकऱ्यांना झाडे वाटप, खत वाटप केले जाणार आहे. घावनळे ग्रामपंचायत येथे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नेरूर कलेश्वर मंदिर येथे लघुरुद्र व मंदिरात दीपोत्सव केला जाणार आहे.
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे कोविड योद्ध्यांचा सत्कार तर झाराप येथे गुणवंत विद्यार्थी व कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. वेताळबांबर्डे येथे वृक्षारोपण, हिर्लोक येथे कोविड योद्ध्यांचा सत्कार, गिरगाव कुसगाव येथे शेतकऱ्यांना वृक्ष वाटप, निरूखे येथे वृक्ष वाटप पांग्रड येथे कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पाट येथे अपंग व्यक्तींना सतरंजी वाटप करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे *मालवण तालुक्यातील* टोपीवाला हायस्कुल, कुडाळकर हायस्कुल, कन्याशाळा व पत्रकार कक्ष येथे संगणक संचाचे वाटप केले जाणार आहे. चाफेखोल व वायंगवडे येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.