You are currently viewing दाभिळ नदीवरील ब्रिटिशकालीन पूल नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत

दाभिळ नदीवरील ब्रिटिशकालीन पूल नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत

सावंतवाडी ( नितेश दळवी)

दाभिळ नदीवरील ब्रिटिशकालीन पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. अपघातास निमंत्रण ठरत असलेला हा कमी उंचीचा पूल नूतनीकरण होण्यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आली. प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सरमळे विलवडे सीमेवर दाभिल नदीवर असलेला ब्रिटिश कालीन पूल गेली अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गावरून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची वर्दळ नेहमीच असते. विलवडे पंचक्रोशीतील गावानाही हा मार्ग जवळचा ठरतो. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली राहतो. कमी उंचीच्या पुलामुळे अनेक वेळा अपघातही घडले. अपघातास निमंत्रण ठरलेला हा पूल होण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा शासन दरबारी मागणी केली मात्र दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा