महागाई विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे भव्य निषेध रॅली काढली.या रॅलीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते.
कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरून रॅलीला सुरुवात झाली. बैलगाडीतून जिल्हाध्यक्षांनी केंद्र तील मोदी सरकारचा निषेध केला.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, दादा परब, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास गावडे, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख,सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. साक्षी वंजारी, अड. नीलिमाताई गावडे,तालुकाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा एन एस यु आयचे अध्यक्ष कौस्तुभ गावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील युवकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, कुडाळ पोलीस स्टेशन नजीक रॅली आल्यावर पोलिसांनी जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी मीडियासमोर वाढत्या महागाई विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
चांगले दिवस येतील असं सर्व सामान्य जनतेला वाटलं होतं, मात्र वाढत्या महागाईमुळे जनतेच जगणेच मुश्कील झाले आहे. मोदी सरकारने खोटी आश्वासने दिली असा आरोप त्यांनी केला.