प्रवीण भोसले, पुंडलिक दळवींनी दिला धीर; नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन…
सावंतवाडी
माडखोल येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज राष्ट्रवादी नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी धाव घेतली. यावेळी संबंधित नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी,यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परिसरात झालेल्या नुकसान ग्रस्तांना ताडपत्रीचे वाटप केले. तसेच गणेशमूर्ती शाळा दुकानांत व घरांना भेट देत त्यांना मानसिक आधार दिला.
माडखोल सरपंच संजय शिरसाट, ग्रा.प. सदस्य सिद्धेश शिरसाट, पोलिस पाटील उदय राऊत, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, इफ्तिकार राजगुरू,संतोष जोईल, नियाज शेख,मनोज वाघमोरे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संबंधित ग्रामस्थांनी आम्हाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे केली.दरम्यान नक्कीच आपण नुकसान भरपाई देण्यास प्रयत्न करू असे यावेळी आश्वासन भोसले यांनी दिले.