राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा पुढाकार
सिंधुदुर्ग
आठवडाभर कोसळणारा मुसळधार पाऊस अनेकांच्या वाट्याला दुःख देवून गेला. कोकणात या अतिवृष्टीने अक्षरशः कहर माजवला. अनेकांची घरं तुटून गेली, तर अनेकांचे संसार. तर अनेकांचा जगाशी असलेला संपर्कच तुटून गेला. चिपळूणमध्ये या अतिवृष्टीचा फटका एवढा तीव्र बसला, की सारं चिपळून चोहीबाजूने पाण्याच्या मगरमीठीत सापडलं. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. घरांत पाणी शिरून सारं सामान वाहून गेलं. दरडी कोसळल्याने अनेकांना जीवाला मुकावं लागलं. एकंदर या अतिवृष्टीमुळे चिपळूनची अवस्था अतिशय भयावह झाली आहे. या चोहोबाजूंनी पर्जन्यसंकटात सापडलेल्या चिपळूणवासियांना आता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसने मदतीचा हात दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत याच्या पुढाकाराने चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पाच हजार किलो तांदूळ, कपडे आणि जीवनावश्यक औषधांची मदत करत सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसने राजकारणाच्या आधी समाजकारण महत्त्वाचं असतं, हे दाखवून दिलं आहे.
चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी हानी झाली. घरातील शैक्षणिक साहित्य, जीवनावश्यक साहित्य, कपडे, यंत्रसामुग्री असे अनेक साहित्य पुरात वाहून गेल्याने चिपळूणवासियांसमोर जगण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटावेळी चिपळूणवासियांच्या मदतीला सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस धावून आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून पाच हजार किलो तांदूळ, कपडे व जीवनावश्यक साहित्य, औषधे इ. चा पुरवठा चिपळून राष्ट्रवादी काँग्रेसचे आम. शेखर निकम यांच्याकडे करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली ही मदत चिपळूणवासियांसाठी बहुमोलाची असून पूरग्रस्तांना पुन्हा उभारी देण्यासाठी आणि संकटात खचलेल्यांना पुन्हा लढण्याची ऊर्मी देण्यासाठी ती नक्कीच उपयोगी ठरेल.