You are currently viewing मळभ

मळभ

हायकू काव्य

अंधूक प्रकाश
अंधार भासे सारा
काळा पसारा

सांज सकाळ
हरवली किरणे
अस्पष्ट गाणे

पाऊस धारा
संततधार मारा
असे न थारा

भिजती पक्षी
थरथर कापती
ऊब शोधती

बुडाली शेती
कष्ट किती उरती
होतेच माती

जिथे गरज
तिथे वसे दुष्काळ
ओसाड माळ

आघात मनी
धरणी ही पाण्यात
पाणी डोळ्यात

©(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा