You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षांकडून पूरस्थितीची पहाणी

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षांकडून पूरस्थितीची पहाणी

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्कालीन विभाग सतर्क करा, आपदग्रस्तांना तत्काळ तातडीची मदत द्या, अतिवृष्टीमुळे जीवित हानी होऊ नये याची कटाक्षाने काळजी घ्या अशा सक्त सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना तत्काळआर्थिक मदत मिळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची भेट घेणार असल्याचे बाळा गावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. नीलिमा ताई गावडे यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा