बांदा
मानवी जीवनात गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या भारतात गुरु शिष्याची महान परंपरा आहे गुरू आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे हे आपल्याला शिकवतात. पालक, शिक्षक व आध्यात्मिक असे तीन गुरु प्रत्येकाला दिशादर्शक असतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करता येणे अशक्य असल्याने बांदा केंद्र शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच आपले पहिले गुरू आणि वडिल व घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना वंदन करून साजरा केला.
बालपणातच आई वडील प्रत्येक गोष्ट शिकवतात ,योग्य काय आणि आयोग्य काय याची जाणीव करून देतात तसेच चांगल्या सवयी लावतात या आपल्या आईवडिलांचे विद्यार्थ्यांनी औक्षण करुन पुष्पगुच्छ व भेटकार्ड देऊन सन्मान केला.
या दिवशी शाळेचा विद्यार्थी नैतिक निलेश मोरजकर व निल नितीन बांदेकर यांनी आॉनलाईन आपल्या भाषणातून गुरु पौर्णिमेचे महत्त्व विशद केले.