वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 219 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी
किनारपट्टीचे तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासात पावसाने शंभरी पार केली आहे. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 219 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 137.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2576.138 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 184(2500), सावंतवाडी – 210(2750.10), वेंगुर्ला – 86.60(2154), कुडाळ – 126(2412), मालवण – 27(2819), कणकवली – 185(2805), देवगड – 65(2339), वैभववाडी – 219(2830), असा पाऊस झाला आहे.
आतापर्यंत सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 2 हजार 830 मि.मी. झाला आहे. त्यानंतर मालवण, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, देवगड तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात 2 हजार 154 मि.मी. झाला आहे.