You are currently viewing आंबोली घाट बंद…

आंबोली घाट बंद…

भली मोठी दरड रस्त्यावर…

सावंतवाडी

तालुक्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अखेर आंबोली घाटात पूर्वीचा वस येथे भली मोठी दरड रस्त्यावर कोसळली असून, सावंतवाडी बेळगाव राज्यमार्ग बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. ही घटना काल रात्री १२ च्या सुमारास घडली असून, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. परंतु, प्रशासनाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी अजूनही दाखल झाला नसल्याने, नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 17 =