You are currently viewing अनेक वेबसाईट्सचा खोळंबा…

अनेक वेबसाईट्सचा खोळंबा…

सर्व्हर डाउन झाल्याने पेटीएमसह जगभऱातील अनेक वेबसाईट्सचा खोळंबा झाला. अकमाई (Akamai) टेक्नोलॉजीच्या सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पेटीएमसह जगभरातील वेबसाईट्सना फटका बसला. अकमाई ही सर्व्हर प्रोव्हायडर वेबसाईट आहे. त्यामुळे जागतिक एअरलाइन्स, बँका आणि स्टॉक एक्सजेंचमध्ये याचे परिणाम दिसून आले. नेमकं तांत्रिक कारण काय आहे? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वेबासाईट्समोर Denial-of-Service (DDoS) असा मॅसेज दाखवत होता. तसेच सेवा तात्पुरती खंडीत करण्यात आल्याचं दाखवत होतं. काही वेळानंतर प्रयत्न करून बघा असंही त्या मॅसेजमध्ये होतं. मात्र वारंवार प्रयत्न करुनही वेबसाईट्स ओपन होत नव्हत्या. अखेर तासाभराने वेबसाईट्स ओपन झाल्या आणि वापरकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पेटीएम या ऑनलाइन पेमेंट कंपनीलाही फटका बसला. पेटीएम मनीने याबाबत ट्वीट करु अकमाई, डीएनएस प्रोव्हाडर्समुळे सेवा खंडीत झाल्याची माहिती दिली. पेटीएम ॲप उघडल्यानंतर एरर येत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लवकरच ही समस्या सोडवली जाईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं.

पेटीएएम व्यतिरिक्त FedEx, Cricinfo, Cricbuzz, Hotstar, SonyLiv, Airbnb, Hsbc या वेबसाईट्सनाही फटका बसला.

प्रतिक्रिया व्यक्त करा