आठ कुटुंबाचा धान्य, कपड्यासह संसार गेला वाहून
अखंड लोकमंचचे अध्यक्ष, चित्रकार,नामानंद मोडक यांनी आपल्या घरी दिला निवारा
कणकवली :
कणकवली निम्मेवाडी गावळदेव येथे राहत असणाऱ्या कातकरी कुटुंबियांच्या झोपडीत जाणवली नदीचे पाणी घुसले.जाणवली नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने हे पाणी अचानक आले त्यामुळे सुमारे आठ कुटुंबे उघड्यावर आली आहेत.या कुटूंबाचे धान्य, कपडे, भांडी असा संपूर्ण संसार वाहून गेला. नदीने रौद्र रूप धारण त्यावेळी वाड्यावर गरोदर महिला आणि छोटी बालके होती. पुरुमंडळी मंजुरीसाठी बाहेर गेली होती अचानक पाणी वाढल्याने त्यांनी स्वतःचा जीव वाचविला मात्र संसार वाहून गेला. हे वृत्त कळताच अखंड लोकमंच चे अध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक यांनी निम्मेवाडी येथे धाव घेतली आणि कुटूंबियांना आपल्या घरी आणून आश्रय दिला.
कातकरी कुटूंबातील एका महिलेने आणि तीन बालकांनी पुराच्या पाण्यातुन बाहेर येत आपला जीव वाचविला.मात्र कातकरी बंधवांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे अन्न धान्य वाहून गेले.खुऱ्याड्याखालील कोंबड्या आणि काही बकऱ्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आहे. दरम्यान अखंड च्या शैला कदम यांनी या छोट्या मुलांना आधार देत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.