You are currently viewing कणकवली भागात कलमठ (महाजनीनगर) येथील रहिवाशांना रसायनयुक्त पाण्याचा त्रास

कणकवली भागात कलमठ (महाजनीनगर) येथील रहिवाशांना रसायनयुक्त पाण्याचा त्रास

कणकवली

कलमठ (महाजनीनगर) ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथील सापळे गॅरेज व मारुती शोरूम मधिल पेट्रोल , डिझेल,ऑइल व केमिकल मिश्रित रसायनयुक्त पाणी सोडत आहे. तसेच या रसायनयुक्त पाण्यामुळे सदर रहिवासी भागात वर्षभर दुर्गंधी असते. त्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होतो.  तसेच पावसाच्या दिवसात पाणी गटारात मूरते व विहिरीत जाते.

तसेच रसायनयुक्त पाण्यामुळे हवा, पाणी व जमीन दूषित होत आहे. त्यामुळे गॅरेज नजीक रहिवाशांच्या आरोग्याचे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  तरी सदर गोष्टीचा विचार करून आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे अनंत गंगाराम पिळणकर (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग) यांनी निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांना कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा