सिंधुदुर्गातील पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय गुन्हा अन्वेषणाच्या व कर्तव्याच्या बातम्यांना सतर्क पोलीस टाईम्स साप्ताहिकात व वेबसाईटवर प्रसिद्ध करणार – राजन रेडकर.
सतर्क पोलीस टाईम्स साप्ताहिकाच्या अद्ययावत वेबसाईटचे अनावरण लोहमार्ग पोलीस आयुक्त श्री. कैसर खालिद, भापोसे यांच्या हस्ते त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात पार पडल्याची माहिती आशिष सुभेदार यांनी दिली.
लोहमार्ग पोलीस आयुक्त श्री.कैसर खालिद यांनी सतर्क पोलीस टाईम्स साप्ताहिकाच्या वेबसाईटचे अनावरण करतांना महाराष्ट्र पोलीसांची गुन्हा अन्वेषणाच्या विषयावरील कार्यपद्धतीच्या अधिकृत बातम्या वेबसाईटवर पाहतांना वेबसाईट बनवणारे माहिती व तंत्रज्ञान प्रमुख चेतन चव्हाण व सह-संपादक केतन चव्हाण यांचे कौतुक करून सतर्क पोलीस टाईम्स ची वेबसाईट ही तुलनात्मक दृष्टया पोलिसांच्या कर्तव्याला व्यासपीठ देणारी असून तू अद्ययावत व खूप छान पध्दतीने मांडणी केलेली असल्याने लोहमार्ग पोलीस आयुक्त श्री.कैसर खालिद यांनी सतर्क पोलीस टाईम्स टीमला याबाबत विशेष मार्गदर्शन केले, तसेच वेबसाईट अनावरणाच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे अभिनंदन केले.
सतर्क पोलीस टाईम्स चे मुख्य संपादक शमशुद्दीन शेख यांनी खून, चोरी, दरोडा, अपहरण, फसवणूक, खंडणी या सदराखाली महाराष्ट्र पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गुन्ह्याचा योग्य तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबाबतची बातमी त्या त्या सदराखाली फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून वेबसाईटवर प्रसिद्ध करून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सतर्क पोलीस टाईम्सच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
सिंधुदुर्गातील पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कर्तव्याच्या व गुन्हा अन्वेषणाच्या अधिकृत बातम्या ह्या जिल्ह्यातील पोलिसांचे मनोधैर्य उंचाविण्याकरिता सतर्क पोलीस टाईम्स च्या साप्ताहिक व वेबसाईटवर प्रसिध्दी देणार असल्याची माहिती सल्लागार संपादक राजन रेडकर यांनी दिली.
संपादक शमशुद्दीन शेख यांनी लोहमार्ग पोलीस आयुक्त श्री. कैसर खालिद यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना काळात ढासळलेल्या आरोग्य सेवेबाबत, जिल्ह्यात सुसज्ज असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे याकरिता, तसेच प्रमुख जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी यांची रिक्त पद तात्काळ भरावीत याकरिता दिनांक २५ जून ते दिनांक २९ जून २०२१ रोजी असे सलग १०० तास बेमुदत आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. त्या उपोषणास सतर्क पोलीस टाईम्सच्या माध्यमातून राजन रेडकर, सौ.रीमा मेस्त्री, भूषण मांजरेकर, सौरभ नागोळकर, राजाराम@आबा चिपकर यांनी सहभाग घेतला होता. सलग १०० तास उपोषणास बसल्याने राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास ९६८ करोड रुपये मंजुर केल्याने जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागला अशी माहिती दिली असता, पोलीस आयुक्त श्री. कैसर खालिद यांनी उपोषणकर्त्यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय मागण्यांकरिता भर पावसात उपोषण करीत असतानाचा व्हिडीओ पाहिला असून, उपोषणकर्त्यांच्या या कामगिरीबाबत अभिनंदन केलेले आहे.
याप्रसंगी सतर्क पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक शमशुद्दीन शेख, सल्लागार संपादक राजन रेडकर, माहिती व तंत्रज्ञान प्रमुख चेतन चव्हाण, कायदेविषयक तज्ञ ऍड. देवेंद्र अंदेवार, सह संपादक योगेश बाबरेकर, केतन चव्हाण, रियाज शेख, रणवीर सिंग, अख्तर हुसेन शहा हे कार्यक्रमास उपस्थित होते.
सतर्क पोलीस टाईम्सच्या वेबसाईट उदघाटनाच्या विशेष कोकण प्रतिनिधी प्रसाद गावडे, कोकण सल्लागार कृष्णा मराठे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी प्रतिनिधी आशिष सुभेदार, वेंगुर्ला प्रतिनिधी सौरभ नागोळकर, सिद्धेश शेलटे, राजाराम चिपकर, विनय मेस्त्री तसेच भूषण मांजरेकर, प्रविण भगत, जगन्नाथ राणे, रविंद्र राणे, अरुण कांबळी, नारायण मेस्त्री यांनी मुख्य संपादक शमशुद्दीन शेख यांना शुभेच्छा दिल्या.