राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष
झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गावर अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे, दिशादर्शक फलकही नाहीत त्यामुळे हा मार्ग अपघातास निमंत्रण ठरत आहे, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
झाराप पत्रादेवी चौपदरी महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पावसाळ्यात कणकवली दरम्यान भेगा पडल्या आहेत. पावसाचे पाणी ब्रिज वर साचत आहे. दिशादर्शक फलक ही नाहीत त्यामुळे हा मार्ग अपघातास निमंत्रण ठरत आहे याकडे अनंत पिळणकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर सोबत जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर, अजय जाधव, देवेंद्र पिळणकर उपस्थित होते.