तात्काळ दुरूस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सुचना..
वैभववाडी
गेल्या आठवड्यात करुळ घाटात खचलेल्या रस्त्याची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी सोमवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित विभागाला लवकरात लवकर रस्ता दुरूस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सुचना केल्या. जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे करुळ घाटात रस्त्याच्या दरीकडील मोरीचा कठडा ढासळला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भुईबावडा व फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.
दरम्यान सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे, कणकवली प्रांताधिकारी श्रीमती वैशाली राजमाने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित विभागाला रस्ता दुरूस्ती लवकरात लवकर करून वाहतूकीस सुरळीत करण्याच्या सुचना केल्या. यावेळी वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, राष्ट्रीय प्राधिकरणाच्या श्रीमंत पाटील, उपभियता सा बा वैभववाडीचे पी व्ही कांबळे, शाखा अभियंता शुभम दुडय, मंडळ अधिकारी पावसकर, पोलीस राजू जामसंडेकर गणेश भोवड, आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.