कसाल तेलीवाडी येथे सुरू असलेल्या दारू विक्री अड्ड्यावर आज राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने धाड टाकून एकाला अटक केली.तर ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजन मनोहर पेडणेकर (वय ५५) असे त्याचे नाव आहे.ही कारवाई आज सकाळी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पेडणेकर हा अवैधरीत्या गोवा बनावटी दारुची विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार अचानक छापा घातला असता पेडणेकर याच्या ताब्यात ४६,०८० रुपयांची गोवा बनावट दारु जप्त या कारवाईत करण्यात आली. विविध बॅन्डचा अवैध गोवा बनावटी दारुचा साठा जप्त करण्यात आला. सदर इसमावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये जागीच गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई अधीक्षक श्री. डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक डि. एम. वायदंडे, जवान श्री. आर. एस. शिंदे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचे पुढील तपास निरीक्षक एस. के. दळवी हे करत आहेत.