कणकवली
बाजारपेठेतील रहिवासी सदानंद विठ्ठल बांबूळकर (वय ८०) यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी पहाटे निधन झाले. कणकवली काशीविश्वेश्वर देवस्थानचे सचिव व भालचंद्र महाराज संस्थांनचे विश्वस्त होते. शहरातील धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.त्यांचा स्वभाव मनमिळावू व शांत होता. आंबेआळीत त्यांचे किरणा मालाचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,दोन मुली असा परिवार आहे. हेमंत व प्रसाद बांबूळकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी कणकवली येथील स्मशानभूमती अंत्यसंस्कार करण्यात आले.