You are currently viewing राजापुरातील सर्व रस्त्यांचे प्रश्न निलेश राणेंनी लावला मार्गी

राजापुरातील सर्व रस्त्यांचे प्रश्न निलेश राणेंनी लावला मार्गी

दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी श्री.राणे यांचे मानले आभार

राजापूर :

राजापूरात मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत जनतेतुन होणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संबधीत ठेकेदार कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्याकडून केली जाणारी दादागिरी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना नाहक त्रास होत होता. ग्रामस्थांना न्याय द्यायला शिवसेनेचे खासदार, आमदार, पालकमंत्री कुणीच धावून आले नाही. मात्र, त्यावेळी जून महिन्यात भाजपाचे नेते, माजी खासदार निलेश राणे राजापूर दौऱ्यावर आले असता राजापुरातील सर्व ग्रामस्थांनी राणेंकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी आपल्या समस्या श्री. राणेंसमोर मांडल्या. राणेंनी लगेच ठेकेदार, अधिकाऱ्यांना बोलावून खडेबोल सुनावले होते तसेंच तालुक्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पहाणी देखील केली होती. राणेनी पाहणी केलेल्या सर्व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत आहे. त्यामुळे दिलेला शब्द निलेश राणेंनी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी श्री. राणे यांचे आभार मानले आहेत.

प्रशासनाच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे नेरेकवाडी, कोदवली डुंगी, वरचीपेठ येथील नवीन पुल, अर्जुना नदी पात्रातील गाळ, उन्हाळे-कोंंढेतड रस्ता, हातिवले, कोंंडये येथे निकृष्ठ दर्जाचे काम झाले होते. ग्रामस्थांच्या कामांबाबतच्या तक्रारींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करत निलेश राणे यांनी दखल घेतली. याप्रसंगी त्यांनी महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांना चांगलेच फैलावर घेतले होते. यावेळी श्री. राणे म्हणाले होते की, तुमची कुणाचीही मनमानी चालणार नाही. चांगल्या कामाला कोकणी जनता सहकार्य करते. मात्र त्याचा गैरफायदा घेऊ नका, त्या तक्रारींचे निवारण करा. कोणीही वैयक्तीक लाभ तुमच्याकडे मागत नाही, मात्र काम करताना ठरल्याप्रमाणे रस्ते, जोडरस्ते, मंदिरे यांची बांधकामे करून दिलीच पाहिजेत.

तसेच हातिवले येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रस्ता का ठेवला नाही असा प्रश्न उपस्थित करून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी रस्ता झाला पाहिजे अशी मागणी राणेंनी केली होती. तर उन्हाळे-कोंढेतड मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे जीवीतहानी झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल राणेंनी उपस्थित करत त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे रस्ता तयार करण्याचे आदेश दिला दिला होता. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या घराजवळ व शेतात दगड व मातीचे ढिग करून ठेवण्यात आले होते. तर महामार्गावर अनेक ठिकाणी चिखल व दलदलीचे साम्राज्य पसरले होते. पावसाळयात सलग दुसऱ्या वर्षी जागा मालक, शेतकरी, वाहन चालक आणि जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता.

मात्र या ग्रामस्थांच्या पाठीशी निलेश राणे खंबीरपणे उभे राहून वारंवार अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत राजापूर तालुक्यातील ग्रामस्थांच्या ज्या समस्या होत्या त्या १००% प्रश्न श्री. राणे यांनी मार्गी लावल्यामुळे ग्रामस्थांनी श्री राणे यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा