You are currently viewing साटेली-भेडशी मध्ये शासनाच्या जागेत बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन प्रकरण दडवून ठेवण्याचा प्रयत्न

साटेली-भेडशी मध्ये शासनाच्या जागेत बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन प्रकरण दडवून ठेवण्याचा प्रयत्न

परशुराम उपरकर यांचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप

जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा

दोडामार्ग

साटेली- भेडशी मध्ये महाराष्ट्र शासनाच्या गायरान म्हणून समजल्या जाणाऱ्या शासनाच्या मालकीच्या जागेत काही व्यक्तिंनी बेकायदेशीररित्या गौण खनिज ( जांभा दगड) उत्खनन केले आहे.त्यामुळे ज्यांनी त्या शासनाच्या जागेत बेकायदेशीररित्या उत्खनन केले आहे. त्या संबंधीत व्यक्तिंवर कडक कारवाई व्हावी यासाठी शेतकर्‍यांनी अनेक निवेदने तसेच २६ जानेवरी रोजी जिल्हाधीकारी कार्यालया समोर उपोषण देखिल केले होते.

संबंधीत प्रकरणात अधिकार्‍यांनी काही बड्या खाण मालकांची नावे दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच संबंधीत प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत आले तरी देखिल त्या शासनाच्या जमिनिचा सर्वे झालेला नाही. तसेच शेतकरी ग्रामस्थ अधिकार्‍यांकडे संबंधित प्रकरणाची कारवाई कुठं पर्यंत आली अशी विचारणा केल्यावर शेतकरी ग्रामस्थांना तेथे उलट सुलटउत्तरे दिली जातात.
तसेच सत्ताधारी आणि अधिकारी या प्रकरणात टक्केवारीसाठी मिलाभिगत असल्यामुळे प्रकरण दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप माजी आमदार तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

तसेच हे प्रकरण दडवून ठेवणाऱ्या बड्या खाण मालकांची नावे दडवणाऱ्या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी यासाठी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे शेतकर्‍यांना सोबत घेवून कोरोना आटोक्यात आल्यावर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याचे जिजी उपरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा