चिपी विमानतळ लवकरच सुरू होणार
वेंगुर्ले :
चिपी विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्या प्रकल्पाचे श्रेय देण्यासाठी अनेक जण आता पुढे येतील. मात्र विमानतळाचे काम धिम्या गतीने सुरू होते. तेव्हा खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर सातत्याने पाठपुरावा करत राहिले. त्यामुळे लवकरच विमानतळ प्रकल्प सुरू होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील सेवा सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. परुळे येथील वराठी मंगल कार्यालय शिवसेना संपर्क अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाला. यावेळी ना. सामंत बोलत होते. व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर जिल्हाप्रमुख संजय पडते संदेश पारकर बाळू परब, बाळा दळवी सचिन देसाई, सुकन्या नरसुले, योगेश तेली, महेश सामंत, सरपंच गणेश तारी, परुळे उपसरपंच मनीषा नेवाळकर, पंकज शिरसाट आदी उपस्थित होते. आमदार केसरकर म्हणाले, दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्यास विरोधक आघाडी घेत आहेत. आपल्याला शिवसेना घराघरात बसवायची असल्याचे सांगितले.