सिंधुदुर्गनगरी
राज्यातील गवताळ भाग व चारा धोरण निश्चित करण्यसाठी करावयाच्या अहवालात नमूद करण्याकरिता व सदर अहवाल अभ्यासपूर्ण, अद्यावत व निर्दोष होण्याकरिता याबाबत कार्यरत व्यक्ती संस्थाकडून अभिप्राय मागविण्यात येत आहेत.
राज्यातील वन विभागातील गवती कुरण व सार्वजनिक गायरान विकासाकरिता उपयुक्त होतील अशा प्रकारचे आपले अभिप्राय, सूचना व माहिती आयुक्त पशुसंवर्धन,महाराष्ट्र राज्य पुणे-67 यांना दिनांक 20 जुलै 2021 रोजी पर्यंत ई-मेलव्दारे ddfoddercah@gmail.com सादर करण्यात यावी असे आवाहन सचिन्द्र प्रताप सिंह पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांच्या मार्फत करण्यात येत आहे.