You are currently viewing शिवसैनिकांनी एकत्रित रित्या काम करून संघटना वाढीसाठी मेहनत घ्यावी – आ. वैभव नाईक

शिवसैनिकांनी एकत्रित रित्या काम करून संघटना वाढीसाठी मेहनत घ्यावी – आ. वैभव नाईक

कुडाळ तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला उत्साहात प्रारंभ

राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे कोकणावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केले. कुडाळ महिला बाल रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे. तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीवेळी त्यांनी पूर्ण ताकद लावून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शासकीय पातळीवर बळ दिले. नुकसान भरपाई मिळवून देऊन लोकांना दिलासा दिला.लोकांच्या अडचणीच्या वेळी आपण त्यांना काय मदत करतो हे लोक विसरत नाहीत. त्यामुळे संकट काळात लोकांच्या मदतीला प्रत्येक शिवसैनिकाने धावून गेले पाहिजे. सर्व शिवसैनिकांनी एकत्रित रित्या काम करून जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी मेहनत घ्यावी. आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामे लोकांपर्यत पोहोचवावित असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविले जात असून बुधवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला उत्साहात प्रारंभ झाला. मुसळधार पाऊस सुरु असून देखील शिवसंपर्क अभियानाला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी तेंडोली, पाट, नेरूर पंचायत समिती मतदारसंघ निहाय बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानांतर्गत गावागावात वेगवेगळे उपक्रम शिवसेनेतर्फे राबविण्यात येणार आहेत.
यावेळी तेंडोली गोवेरी येथे कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, विकास कुडाळकर, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, पं. स. सदस्या अनघा तेंडोलकर, विभाग प्रमुख संदेश प्रभू, अरविंद तेंडुलकर, उमेश घाटकर, सायली सर्वेकर, राजेंद्र राऊळ, किशोर धुरी, सुरेश आईर,
पाट आंदुर्ले येथे पाट सरपंच रीती राऊळ, आंदुर्ले सरपंच पूजा सर्वेकर, माड्याची वाडी सरपंच सचिन गावडे, उपविभागप्रमुख महेश वेळकर,आंदुर्ले माजी सरपंच संतोष पाटील, बाळा मोर्ये
नेरूर येथे विभागप्रमुख शेखर गावडे, रुपेश पावसकर, मंजुनाथ फडके, कवठी सरपंच रुपेश वाडये, प्रसाद पोईपकर, चेंदवण सरपंच उत्तरा धुरी, संचित फडके, भक्ती घाडी, विनय गावडे, पिंट्या गावडे, शामा परब, भूपेश चेंदवणकर, मंगेश बांदेकर, देवेंद्र गावडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा