You are currently viewing संदेश पारकर तरुणाईच्या मनावर राज्य करणारे शिवसेनेचे जिल्ह्यातील युवा नेतृत्व…

संदेश पारकर तरुणाईच्या मनावर राज्य करणारे शिवसेनेचे जिल्ह्यातील युवा नेतृत्व…

निर्भीड,आक्रमक वृत्तीचा नेता म्हणून राज्याच्या राजकारणात ओळख..

संदेश पारकर….

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उगवलेला धगधगता सूर्य म्हणजे संदेश पारकर. आपल्या आक्रमक, निर्भीड नेतृत्वाने जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून संदेश ओळखला जाऊ लागला तो अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा त्याच्या प्रवृत्तीमुळेच.
राजकीय आखाड्यात समोर कोण आहे हे न पाहता त्याला भिडण्याचा त्याचा स्वभाव तरुणाईच्या मनावर वेगळी छाप पाडून गेला. कित्येक तरुण संदेशभाई म्हणून त्याच्या एका शब्दावर, हाकेवर धावून यायला लागले. कॉलेज जीवनापासून संदेश मध्ये राजकीय नेतृत्व दिसून यायला लागले. कॉलेजची निवडणूक देखील चुरशीची होऊ लागली होती. महाविद्यालयीन दिवसात लहानमोठ्या प्रश्नांसाठी झगडता झगडता संदेश पारकर हे कणकवलीकरांचे नेतृत्व म्हणून उदयास आले. कणकवलीचे सरपंच ते पहिला नगराध्यक्ष, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष,अशी विविध पदे भूषविले संदेश पारकर हे कणकवलीकरांच्या मनातील आमदार आहेत.
संदेश पारकर यांचा आज ५३ वा वाढदिवस. संदेश पारकरांचा वाढदिवस म्हणजे कणकवलीकरांसाठी एक सोहळाच असतो. परंतु संदेश पारकर आपला वाढदिवस साजरा करतात तो ज्या भूमीत आपण जन्मलो त्या भूमीचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक उपक्रम याच भावनेतून. पाचशेच्या वर रक्तदाते पारकरांच्या वाढदिवशी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपतात. त्यांच्या कार्यक्रमात कोणीही लहान मोठा नसतो, कोण कोणाला आदेश देत नाहीत तर आपलाच वाढदिवस समजून प्रत्येकजण हा उत्सव साजरा करत असतात. यातून त्यांच्या कार्यकर्त्यांचे त्यांच्यावरील निस्वार्थी प्रेम दिसून येते आणि संदेश पारकर सुद्धा तेवढ्याच प्रेमाने कार्यकर्त्यांना सांभाळतात.
गोरगरिबांना धान्य वाटप, शालेय साहित्य वाटप, मुलांचा शैक्षणिक प्रश्न, शासकीय कामाचा प्रश्न असो संदेश नेहमीच लोकांच्या मदतीस धावून येतो. त्याच्याकडे पद असो वा नसो, जनतेचे प्रेम आणि विश्वास हेच त्याचं पद मानून संदेश नेहमीच जनतेसोबत असतो. महामार्ग चौपदरीकरण प्रश्नांसाठी सर्वप्रथम कणकवलीत कोण रस्त्यावर उतरत असेल तर तो संदेश! संदेशची लोकप्रियता एवढी आहे की, प्रत्येकजण त्याच्यासाठी झोकून देऊन काम करत असतो. तरुणाईची त्याची ताकद वाखाण्याजोगी आहे.
संदेश पारकरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्यात गुणवंतांचा गौरव व सन्मान, महिलांसाठी आरोग्य शिबीर, गृहोपयोगी वस्तूंचे वाटप, युवकांसाठी मॅरेथॉन स्पर्धा, जेष्ठांचा गौरव, रक्तदान शिबिरे, गरजू होतकरूंना शैक्षणिक साहित्य वाटप, मुलांसाठी निबंध, चित्रकला स्पर्धा, तसेच शालेय विध्यार्थ्यांना मॅरेथॉन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा. अशा उपक्रमातून सांस्कृतिक व क्रीडा कौशल्याला वाव मिळवून दिला आहे. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान देखील केला जातो. कोरोनाच्या संकटात यावर्षी यावर बंधने येतील तरीही पारकरांचा वाढदिवस हा सोहळा म्हणून साजरा होणार.
संदेशने राजकीय प्रवासाला सुरुवात केली तीच मुळात संघर्षातून. अनेक पदे भूषविलेला संदेश जसा सरपंच असताना होता तसाच आजही सर्वसामान्यांसाठी झगडणारा, न्यायासाठी रस्त्यावर उतरणारा संदेश दिसून येतो. त्याचे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या त्रिसूत्रीमुळे भविष्यात संदेश नक्कीच जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना विधिमंडळात देखील दिसेल यात शंकाच नाही. कणकवलीकरांसाठी आणि जिल्हावासीयांसाठी संदेशने नेहमीच आमचो संदेश हीच ओळख कायम ठेवलेली आहे, त्यामुळे भविष्यातही जनतेचा आशीर्वाद मिळवत संदेश पुन्हा एकदा राजकीय पटलावर चमकणारा तारा म्हणून पुढे येईल हे सुद्धा त्रिवार सत्य आहे. गावागावात आपली छाप पाडलेल्या संदेशने बदलत्या राजकीय परिस्थितीतही आपले वेगळेपण आजही जपले आहे.
संदेश पारकरांना उज्वल भवितव्यासाठी आणि यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी आणि वाढदिवसानिमित्त संवाद मिडियाकडून अनेक अनेक शुभेच्छा…..

प्रतिक्रिया व्यक्त करा